साताऱ्याच्या विकासासाठी "महाराष्ट्र स्कूटर' करा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

उद्योगपती राहुल बजाज यांना नुकताच पुण्यात चिरमुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी बजाज यांना महाराष्ट्र स्कूटर्स पुन्हा सुरू करण्याची विनंती अरुण गोडबोले यांनी केली. त्याचवेळी बजाज यांनी राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर गोडबोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाद्वारे पत्र लिहिले आहे. 

आदरणीय मुख्यमंत्री... 
आपण राज्याचा औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील आहात. त्या संदर्भात साताऱ्याच्या संबंधी महत्त्वपूर्ण उद्योगाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्र स्कूटर्स हा कारखाना सरकार व बजाज समूहाच्या सहयोगातून उभारण्यात आला. अल्पावधीतच नावारूपालाही आला. 600 ते 700 लोकांना रोजगार मिळाला आणि अनेक पूरक व्यवसायही उत्तम चालू लागले. "प्रिया' ही त्यांची स्कूटर खूप लोकप्रिय झाली. पुढे तो ब्रॅंड बंद करण्यात आला आणि सरकारने आपले शेअर्स बजाज ऑटोला विकावे, अशा प्रस्तावावर विचार सुरू झाला. त्यांनी शेअरची ऑफर केलेली किंमत सरकारला मान्य झाली नाही म्हणून लवाद नेमण्यात आला. हळूहळू कारखाना निष्क्रिय झाला. कामगार कमी झाले. पूरक उद्योग बंद झाले. राहुल बजाज यांना चिरमुले पुरस्कार प्रदान करताना हा विषय निघाला. हा कारखाना पुन्हा सुरू झाला तर साताऱ्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी खात्री आहे. राहुलजींचे मोठेपण असे की त्यांनी मनमोकळेपणे चर्चा केली. त्या किंमतीवर हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल झाला, पण महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. ते अजून पेंडिंग आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही सर्वांनी आग्रह केल्यावर त्यांनी या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून राज्य सरकार पुढे आले तर बजाज ग्रुप त्यावर निश्‍चित विचार करेल, असे आश्वासनही दिले आहे. 

आपला, 
अरुण गोडबोले, सातारा 

Web Title: marathi news satara development of Satara start the Maharashtra Scooter