रोजगार मेळावा देतोय स्थिरतेची वाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सातारा - सुशिक्षित युवक आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत. मात्र, या युवकांकडे पुरेसे कौशल्य नाही, नोकरीच्या संधीची माहितीच होत नाही, अशांसाठी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार, उद्योग मार्गदर्शन केंद्रामार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. चालू आर्थिक वर्षात आठ रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यातून ७२१ बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली आहे.

प्रमोद महाजन कौशल विकास कार्यक्रम सातारा जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कौशल्य विकास 

कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ६७ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. कौशल्य विकास विभाग व संबंधित संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रमात १६ क्षेत्रांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सीएनसी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्ती, अन्नप्रक्रिया, ट्रॅव्हलिंग ॲण्ड टुरिझम, फॅशन डिझायनिंग, प्रॉडक्‍शन ॲण्ड मॅन्युफॅक्‍चरिंग आदींचा समावेश आहे. यामध्ये अन्नप्रक्रिया आणि ट्रॅव्हलिंग ॲण्ड टुरिझम या नवीन प्रशिक्षणांचा समावेश आहे. हे सर्व प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्थांतून मोफत दिले जाते. सेवायोजन कार्यालयातून सर्व प्रशिक्षण संस्थांवर मॉनिटरिंग होते. 

चालू आर्थिक वर्षात आठ रोजगार मेळावे कौशल्य विकास विभागाने घेतले आहेत. त्यातून ७२१ बेरोजगारांना नोकरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक जीवनात स्थिरता येऊ लागली आहे; परंतु रिक्‍त जागांची संख्या अधिक असतानाही त्या प्रमाणात सुशिक्षित युवक या मेळाव्यास येत नाहीत. रोजगारांच्या संधी ओळखून सुशिक्षितांनी मेळाव्यात यावे, तसेच कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या वेबवाईटवर जाऊन युवकांनी अधिक माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी व रोजगार, उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी केले आहे.

आकडे बोलतात...
रोजगार मेळावे    ०८
रिक्‍त पदे    २१४२
बेरोजगारांची उपस्थिती    २०६८
रोजगार मिळालेले    ७२१

Web Title: marathi news satara Employment