साताऱ्यातील चौदा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

प्रवीण जाधव
गुरुवार, 15 मार्च 2018

मुलीला तिचे नग्न अवस्थेतील फोटो दाखवून लैंगिक शोषण केले.

सातारा - मेढ्यातील 14 वर्षीय बालिकेवर दोन वर्ष वारंवार अत्याचार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सागर किसन पार्टे (वय 28, रा. आसनी ता. जावली) असे त्याचे नाव आहे. मेढा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर याने 2015 पासून मुलीला तिचे नग्न अवस्थेतील फोटो दाखवून लैंगिक शोषण केले. वेळोवेळी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: marathi news satara girl assault threat intimidation police