कऱ्हाड: जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौदा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

गोटे (ता. कऱ्हाड) येथे काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजता कारवाई झाली. त्यात जुगारात खेळल्या जाणाऱ्या रोख रकमेसह चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कऱ्हाड ; तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी चौदा जणांना ताब्यात घेतले.

गोटे (ता. कऱ्हाड) येथे काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजता कारवाई झाली. त्यात जुगारात खेळल्या जाणाऱ्या रोख रकमेसह चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे व शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

तीन पानी जुगारासाठीच खास पत्र्याचे शेड बांधल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. जमीन मालकावरही गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. १५ हजारांची रोख रक्कम, सहा दुचाकी, पत्र्याच्या शेडचे साहित्य असे सुमारे चार लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

Web Title: Marathi news Satara news 14 arrested in Karhad

टॅग्स