कऱ्हाड: ऊसाच्या ट्रॉलीला ट्रॅव्हल्सने दिली धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या बसचा आज (मंगळवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. मलकापूर येथील डी मार्टसमोर ऊसाने भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ट्रॅव्हल्स पाठीमागून घुसली.

कऱ्हाड : पुणे-बेंगळूर महामार्गावर मलकापूर (ता. कऱ्हाड) जवळील डी मार्ट समोरच आराम बसने ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. अपघात भीषण असल्याने ट्रॉलीतील निम्‍मा ऊस बसमध्ये गेला. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

अपघातात बस चालक गणपतराव गुरव (रा. पुणे) याच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या बसचा आज (मंगळवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. मलकापूर येथील डी मार्टसमोर ऊसाने भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ट्रॅव्हल्स पाठीमागून घुसली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्ये बसच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवून पूर्ववत केली. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
आठ महिन्यांची मुलगी सोसतेय बलात्काराची यातना
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन
शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश
धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना​
ध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी​
ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...!​
सरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ​
महात्मा गांधींना हवं होतं अहिंसक विज्ञान​
स्मरण एका इतिहासाचे​
झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार

Web Title: Marathi news Satara news accident on pune-bangalore highway