मुंडन आंदोलन करुन सरकारचा घातला दहावा

हेमंत पवार
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कण्हेर धरणासाठी तेथिल लोकांना वाघेेश्वर, चिंचणी, पिंपरी, कवठे आणि केंजळ या गावात स्तलांतरित करण्यात आले. मात्र त्या नंतर 40 वर्षांनीही प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून आवश्यक त्या  सोयी-सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी प्रजासत्ताक दिनी प्रांत कार्यालयाबाहेरील रस्त्यावर मुंडण आंदोलन करून सरकारचा दहावा घातला.

कऱ्हाड : वाघेश्वर, पिंपरी, चिंचणी, केंजळ गावच्या कण्हेर धरण प्रकलपग्रस्तां पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तेथील ग्रामस्थांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी मुंडन आंदोलन करुन सरकारचा दहावा घातला होता.

आंदोलनापुर्वी प्रांताधिकाऱी हिंम्मत खराडे यांनी घेतलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने काल भूमी अभिलेख कार्यालयाकडे धनादेश देवुन मोजणीसाठीची कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे मुदतीत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा संघटना व प्रकल्पग्रस्तांना दिला आहे. 

कण्हेर धरणासाठी तेथिल लोकांना वाघेेश्वर, चिंचणी, पिंपरी, कवठे आणि केंजळ या गावात स्तलांतरित करण्यात आले. मात्र त्या नंतर 40 वर्षांनीही प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून आवश्यक त्या  सोयी-सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी प्रजासत्ताक दिनी प्रांत कार्यालयाबाहेरील रस्त्यावर मुंडण आंदोलन करून सरकारचा दहावा घातला. त्यामुळे संबंधित गावच्या प्रश्नासाठी सरकारदरबारी कार्यवाही सुरु होती. त्याअंतर्गत पाटबंधारे विभागाने काल भूमी अभिलेख कार्यालयाकडे धनादेश देवुन मोजणीसाठीची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांतुन समाधान व्यक्त होत असुन हे आंदोलनाचे यश असल्याचे नलवडे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news Satara news agitation in Karhad