सांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा

संदिप कदम
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सदर तक्रार अर्जाची दखल दोन दिवसात न घेतल्यास (ता.२६) रोजी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून, त्यास मुख्याधिकारी जबाबदार असतील असे दोन्ही निवेदनात नमूद केले आहे.

फलटण : शहरातील अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर असताना (मंगळवार) येथील दोन रहिवास्यांनी अतिक्रमण व सांडपाण्याचा होणाऱ्या त्रासाला कंटाळून सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे नगरपालिका मुख्याधिकारी ध्यैर्यशील जाधव यांना दिला.

याबाबत गणेश खंडू अहिवळे (रा. मंगळवार पेठ ) यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मानसिक छळ होत असून, पालिकेकडून होत असलेल्या त्रासाला कुटुंबीय कंटाळले असल्याचे नमूद केले आहे तर बाबा मुस्ताक पठाण (रा. कसबा पेठ ,पाचबत्ती चौक ) यांचे मंगळवार पेठ येथील अॅड. संदीप लोंढे यांचे शेजारी घरासमोरील अतिक्रमण काढलेले नाही. तरी घरासमोरील सोडलेले सांडपाण्याचे पाणी व अतिक्रमण काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.

सदर तक्रार अर्जाची दखल दोन दिवसात न घेतल्यास (ता.२६) रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून, त्यास मुख्याधिकारी जबाबदार असतील असे दोन्ही निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Marathi news Satara News bad water warning about suicide