भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ फलटणमध्ये तीव्र पडसाद

संदिप कदम
मंगळवार, 2 जानेवारी 2018

फलटण (सातारा) : पंढरपूरहून- मुंबईला जाणाऱ्या एसटी बसवर जिंती नाका फलटण येथे दगडफेक झाली आहे. या दगडफेकीमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी दहा वाजता हा प्रकार घडला. दगडफेक का करण्यात आली त्याची चौकशी करण्यात येत आहे. याबाबत मिळाली माहिती अशी की, पंढरपूर आगाराची बस क्रमांक (एमएच 14 बीटी 4111) जिंती नाका येथे आली असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. केली असून एक प्रवाशी गंभीर जखमी  झाला. त्या प्रवाशाच्या कानाजवळ मोठा दगड लागला आहे जखमी प्रवाशाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.

फलटण (सातारा) : पंढरपूरहून- मुंबईला जाणाऱ्या एसटी बसवर जिंती नाका फलटण येथे दगडफेक झाली आहे. या दगडफेकीमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी दहा वाजता हा प्रकार घडला. दगडफेक का करण्यात आली त्याची चौकशी करण्यात येत आहे. याबाबत मिळाली माहिती अशी की, पंढरपूर आगाराची बस क्रमांक (एमएच 14 बीटी 4111) जिंती नाका येथे आली असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. केली असून एक प्रवाशी गंभीर जखमी  झाला. त्या प्रवाशाच्या कानाजवळ मोठा दगड लागला आहे जखमी प्रवाशाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. एसटीवर दगडफेक कोणत्या कारणावरून झाली हे समजू शकले नाही.

 

Web Title: Marathi news satara news bheema koregao incident