साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक येथे आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : येथे भर वस्तीत बाजारपेठेतील व्यापारी विक्रम महाजन या भुसार मालाच्या मालकाच्या घराला आज सकाळी नऊ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : येथे भर वस्तीत बाजारपेठेतील व्यापारी विक्रम महाजन या भुसार मालाच्या मालकाच्या घराला आज सकाळी नऊ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही लाकडी माडीवजा इमारत व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी किसनवीर साखर कारखाना, शरयु साखर कारखाना, फलटण नगरपरिषदेचे तीन अग्निशामक बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी युवकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आसपासची घरे आगीपासून वाचली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विक्रम महाजन देवदर्शनासाठी गेले असून त्यांचे वडील व चुलते घरी होते.

Web Title: Marathi news satara news fire at home