कऱ्हाड: गॅसची वायर लिकेज झाल्याने स्फोट; शहर हादरले

सचिन शिंदे
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

झोपेत असलेल्या नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली. स्फोटाच्या दणक्याने शेजारील सहा दुकानांच्या शटर, फर्निचर, काचांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच फायर ब्रिगेडचे कर्मचारी तेथे पोचले होते. त्यांनी मदत कार्य राबवले.

कऱ्हाड ; गॅसची वायर लिकेज झालेल्या स्फोटाने आज शहर हादरले. पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली.

येथील चावडी चौकातील धोपाटे वाड्यानजीकच्या स्वप्नील रेस्टारंटमध्ये घटना घडली. त्या हाॅटेलसह बाजारपेठतील सहा दुकानांच्या शोरूमचे नुकसान झाले आहे. हाॅटेलमधील गॅस सिलेंडरची वायर लिकेज होती. त्याचा हाॅटेलमधील दिव्याशी संबध आल्याने स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतक्या जोराची होती की, हाॅटेलचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्या हाॅटेलचे शटर सुमारे बारा फूट लांब उडून पडले होते. स्फोटाचा आवाजाने शहरातील निम्मा भाग हादरला.

झोपेत असलेल्या नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली. स्फोटाच्या दणक्याने शेजारील सहा दुकानांच्या शटर, फर्निचर, काचांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच फायर ब्रिगेडचे कर्मचारी तेथे पोचले होते. त्यांनी मदत कार्य राबवले.

Web Title: Marathi news Satara news gas blast in Karhad

टॅग्स