ग्रामपंचायतींपुढे २२ कोटी वसुलीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

सातारा - ग्रामपंचायतींना शासकीय निधीशिवाय कर वसुली हे उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने जिल्ह्यातील गावागावांत घर, पाणीपट्टी वसुलीचा मोहीम गतीत सुरू आहे. या वर्षी ८९ कोटींपैकी ६६ कोटी ६१ लाखांची वसुली झाली आहे, तरीही आता अवघ्या १५ दिवसांत २२ कोटी ६० लाखांची वसुली करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींपुढे उभे आहे. 

ग्रामपंचायतींच्या विकासाचा गाडा चालविण्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर भर दिला आहे. करवसुली हा उत्पन्नाचा मुख्य मार्ग असल्याने ९५ टक्‍के वसुलीचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ठेवले आहे. जिल्ह्यात एक हजार ४९४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपुढे चालू आर्थिक वर्षात ८९ कोटी २२ लाख ४६ हजार वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी फेब्रुवारीअखेरपर्यंत थकबाकीसह चालू वसुलीपोटी ६६ कोटी ६१ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही २२ कोटी ६० लाख ६५ हजारांची वसुली बाकी आहे. 

घरपट्टीची तालुकानिहाय वसुली अशी (आकडे कोटीत) : सातारा ९.५५, कोरेगाव २.०३, खटाव ३.३६, माण १.६६, फलटण ५.५०, खंडाळा ४.४७, वाई २.७०, जावळी १.४०, महाबळेश्‍वर १.३४, कऱ्हाड १०.१९, पाटण ४.५४. अशी एकूण ४६ कोटी ६९ लाखांची (७४.५३ टक्‍के) घरपट्टी वसूल झाली आहे.
पाणीपट्टीची तालुकानिहाय वसुली अशी (आकडे कोटीत) : सातारा २.७४, कोरेगाव १.५९, खटाव २.६२, माण ००.७२, फलटण २.७५, खंडाळा १.३०, वाई १.३६, जावळी ००.८३, महाबळेश्‍वर ००.३२, कऱ्हाड ३.५६, पाटण २.०८. अशी एकूण १९ कोटी ९२ लाखांची (७४.९८ टक्‍के) वसुली झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. मार्चअखेरीस १५ दिवस उरले असल्याने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तारांबळा उडाली आहे. अनेक ग्रामपंचायतींत तर स्पिकरवरून कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. 

Web Title: marathi news satara news grampanchyat recovery