हिंदू एकता आंदोलन तीन तासांत उरकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

जातीय व धार्मिक तेढ निर्माण न होण्याच्या दृष्‍टीने पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करण्याबाबत चर्चा करून त्यावर सकारात्मक प्रतिसाद व अटी शर्थीचे पालन करण्याच्या आश्‍वासनानंतर पदयात्रेस परवानगी देण्याबाबतचा मानस असल्याचे म्हटले आहे.

कऱ्हाड : लव्ह जिहाद विरोधात जनजागृतीसाठी कऱ्हाड ते सातारा दरम्यान आयोजित पदयात्रेला जिल्हा पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने त्याच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनतर्फे सुरू करण्यात आलेले उपोषण अवघ्या तीन तासांत संपुष्टात आले. पोलिस उपाधिक्षक, पोलिस निरक्षकांनी उपोषणस्थळी भेट देवून पोलिस प्रशासनाचा पदयात्रेस परवानगी देण्यास सकारात्मक असल्याचे पत्र दिल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले.

येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी दहाच्या सुमारास उपोषणास प्रारंभ झाला. सुरवातील छत्रपती शिवाजी पुतळ्यास तसेच महापुरूषांच्या छायाचित्रांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपोषणास प्रारंभ झाला. हिंदू एकताचे प्रांताध्यक्ष विनायक पावसकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसरक, श्री. जिरंग, रविंद्र डोंबे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते. दुपारी एकच्या सुमारास पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी उपोषणस्थळ भेट देवून श्रभ. पावसकर यांच्याशी चर्चा केली यावेळी पोलिस उपाधिक्षक श्र.भ. ढवळे यांनी पदयात्रेस परवानी देण्यासंदर्भात पोलिस प्रशासन सकारात्मक असल्याचे पत्र त्यांना दिले.

त्यामध्ये जातीय व धार्मिक तेढ निर्माण न होण्याच्या दृष्‍टीने पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करण्याबाबत चर्चा करून त्यावर सकारात्मक प्रतिसाद व अटी शर्थीचे पालन करण्याच्या आश्‍वासनानंतर पदयात्रेस परवानगी देण्याबाबतचा मानस असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर श्र. भ. पावसकर यांनी पोलिसांकडून पदयात्रेला परवानगी मिळणार असल्याचे लेखी मिळाल्याचे सांगून  उपोषण स्थगित करत असल्याचे उपोषणकर्त्याना सांगितले. 

Web Title: Marathi news Satara news Hindu agitation in Karhad