गृहनिर्माण संस्था अवसायानात निघणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

सातारा - सहकार विभागाने संधी देऊनही सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण (ऑडिट) न केलेल्या सुमारे २२४ गृहनिर्माण संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक २०० संस्था आहेत. 

सातारा - सहकार विभागाने संधी देऊनही सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण (ऑडिट) न केलेल्या सुमारे २२४ गृहनिर्माण संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक २०० संस्था आहेत. 

जिल्ह्यात तीन हजार सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ८०  टक्के संस्थांचे लेखापरीक्षण झाल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगितले जात आहे. उर्वरित २० टक्‍क्‍यांमध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश असल्याचे दिसते. जिल्ह्यात एकूण ९८८ गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ३८८, तर शहरी भागात ६०० संस्था आहेत. या संस्थांना लेखापरीक्षण करून घेण्याची सूचना सहकार विभागाने केली होती. पण, सहकार विभागाने दिलेल्या या संधीकडे अनेक संस्थांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा दुर्लक्ष करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना तालुका निबंधकांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यात ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केलेल्या संस्था अवसायानात काढण्यात येणार आहेत, असे म्हटले आहे.

जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण आणि कऱ्हाड तालुक्‍यांत गृहनिर्माण संस्थांची संख्या जास्त आहे. त्यापैकी साताऱ्यात २००, वाईत पाच, कऱ्हाड- १६, फलटण- तीन अशा एकूण २२४ संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही. गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार विभागाने मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया राबविली. त्यानंतर अनेक गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी व ऑडिट करून घेतले. पण, त्यानंतर ऑडिट करण्याकडे काही संस्थांनी दुर्लक्ष केले आहे.

त्यामध्ये सर्वाधिक संस्था सातारा तालुक्‍यातील आहेत. त्यापाठोपाठ कऱ्हाडमधील संस्थांचा नंबर लागतो. आता ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या या संस्थांना अवसायानात काढण्याच्या नोटिसा सहकार विभागाने बजावण्यास सुरवात केली आहे. 

सातारा तालुक्‍यात एकूण ९२२ सहकारी संस्था असून त्यापैकी ७२२ संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. हे प्रमाण एकूण संख्येच्या ७८ टक्केच आहे. उर्वरित २०० संस्थांमध्ये बहुतांश सर्व संस्था या गृहनिर्माण संस्थाच आहेत.

तालुकानिहाय गृहनिर्माण संस्था 
(कंसात लेखापरीक्षण झालेल्यांची संख्या)

सातारा :     ३७१ (१७१)
कऱ्हाड :     ८१ (६५)
वाई :     २३ (१८)
फलटण :     ०८ (०५)
(आकडे संदर्भ : उपनिबंधक कार्यालय)

Web Title: marathi news satara news home generation organisation

टॅग्स