फलटण : अन्न व भेसळ विभागाचा छापा, अवैध गुटखा सापडला

संदिप कदम
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

फलटण (सातारा) : येथील लक्ष्मी नगर परिसरात असणाऱ्या एम. आरमुगम या बंगल्यावर आज सकाळच्या सुमारास पोलीस व अन्न व भेसळ विभाग सातारा यांनी छापा टाकल्यानंतर गुटख्याची पोती, रोख रक्कम, दागिने असा मुद्देमाल मिळून आला.  

अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी व शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी केली असून यामध्ये किती गुटखा व रोख पैसे तसेच दागिने सापडले याचे मोजमाप सुरू आहे. यामध्ये लहान मुलांसाठी खाद्यपदार्थ असलेले डुप्लिकेट कंपनीच्या अनेक पॅकेट सापडली असून यावर अनेक कंपनीच्या fssi च्या नोंदी पण आढळून येत नाहीत.

सध्या फलटण शहरात गुटख्याची विक्री सर्रास सुरू असून एक महिन्यापूर्वी जिंती नाका येथे रेड पडली होती त्या मध्ये गुटखा सापडला होता. आज सकाळी या बंगल्यावर धाड टाकून या मधील गुटख्याची पोती पकडली आहेत. यामुळे फलटण शहरातील अनेक मोठे दुकानदार गुटख्याची विक्री करीत आहेत मात्र अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरातील दुकानात छापे टाकल्यास अजून गुटखा सापडेल व गुटखा विकणाऱ्यांना चाप बसेल.

Web Title: Marathi news satara news illegal gutkha faltan