स्वच्छ काससाठी सातारकरांची धाव! 

स्वच्छ काससाठी सातारकरांची धाव! 

सातारा - सातारकरांनी ठरविले मनोमनी, स्वच्छ कास शुद्ध पाणी, जपूया कासचा साज, थोडीतरी बाळगूया लाज... अशी घोषवाक्‍ये असलेले फलक हातात घेऊन सुमारे 225 सातारकर धावपटूंनी आज शहरातून जनजागृती दौड काढत कास स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर श्रमदानातून त्यांनी तब्बल 28 पोती कचरा वेचला. 

सातारा हिल मॅरेथॉन संयोजन समिती व अल्सोम (लास्ट संडे ऑफ द मंथ रन) परिवार यांनी संयुक्तपणे ही दौड घेतली. "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून कास संवर्धनाचा उपक्रम सुरू आहे. त्यात या धावपटूंनी सहभाग नोंदवला. सकाळी सव्वासहा वाजता शिवाजी सर्कल येथून झेंडा दाखवल्यानंतर दौड सुरू झाली. बाळगोपाळांसाठी शाहू रस्त्यामार्गे बोगदा असे तीन किलोमीटरचे अंतर होते. कर्मवीर पथावरून राजवाडा व तेथून राजपथमार्गे शाहू चौकातून बोगदा असे सहा किलोमीटरचे अंतर मोठ्यांनी पार करत कास स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर कास तलाव परिसरात सर्वांनी मोठ्या उत्साहात श्रमदान करत सुमारे 25 पोती कचरा गोळा केला. 

दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या "आयर्नमॅन 70.3' ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे डॉ. आदिश पाटील, डॉ. संतोष यादव, अनुप मुथा, डॉ. सुधीर पवार व दिलीप पालवे या पाच धावपटूंचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मोहिमेतील समन्वयक कन्हैयालाल राजपुरोहित, विशाल देशपांडे व निखिल वाघ यांनी मार्गदर्शन केले. "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांनी स्वागत केले. शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले. 

"यशोदा कॅम्पस'चे योगदान  
आजच्या दौडनंतर धावपटूंना कासला नेण्यासाठी यशोदा टेक्‍निकल कॅम्पसने बस उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते साडेदहा कास येथे स्वच्छता मोहीम चालते. मोहिमेत सहभाग व अधिक माहितीसाठी शैलेन्द्र पाटील (9881133085) यांच्याशी संपर्क साधावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com