कऱ्हाड: बिबट्याच्या हल्यात पाच शेळ्या, एक रेडकू ठार

leopard
leopard

मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : बिबट्याच्या हल्यात पाच शेळ्या व एक रेडकू ठार झाले. रेडकासह चार शेळ्यांच्या नरड्याचा चावा घेतला तर एक शेळी फस्त केली आहे. 

जखिणवाडी (ता. कराड) येथील पळुस दरा परिसरातील पावसे वस्तीवर आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. पावसे सकाळी साडेसात वाजता वस्तीवर गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान एकाच वेळी सहा पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यामुळे आगाशिव डोंगर विभागात खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनूसार आगाशिव डोंगर पायथ्याला जखिणवाडी गावच्या हाद्दीत पळुसदरा नावाचा शिवार आहे. या शिवारात पावसे वस्ती आहे. या पावसे वस्ती येथे मारूती केरू पावसे यांचे राणातील शेडवजा घर आहे. त्याच ठिकाणी त्यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात पावसे यांची जनावरे, पाच शेळ्या व एक रेडाकू  बाधलेले असते. शुक्रवारी सायंकाळी जनावरांसह शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. नेहमीप्रमाणे रात्री साडेसातच्या सुमारास पावसे यांनी जनावरांसह शेळ्यांना वैरण टाकुन जखिणवाडी गावात झोपण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठुन पावसे वस्तीवर वैरण टाकण्यासाठी गोठ्यात गेले असता चार शेळ्यांसह एका रेडकाच्या नरड्याचा चावा घेतल्याने मृत अवस्थेत पडल्याचे तर एक शेळी फस्त केली असल्याचे निदर्शनास आले. याबातची खबर पावसे यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल संतोष जाधवर ,  वनरक्षक दादाराव बर्गे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृत शेळ्यांचा व घटनास्थळाचा पंचनामा केला.

घटनास्थळाची परिस्थिती व शेळ्यांवर झालेल्या हल्ल्याची पध्दत पाहता हा हल्ला बिबट्यानेच केला आसल्याचे मत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आगाशिव डोगर पायथ्याशी अषालेल्या गावात बिबट्याचा हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असलेल्यामुळे या परिसरात बिबट्या वावरत आहे हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी आगाशिवनगर परिसरासह बिबट्याने काहीवेळा धोंडेवाडी भागात तर कांही वेळा टाकेवस्ती  व भवानी दरा चचेगांव परिसरातही ग्रामस्थांना अनेकवेळा  दर्शन दिले आहे. मात्र आगाशिव डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्तीत बिबट्याचा सततचा वावर व हल्ल्याच्या प्रकारामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com