कऱ्हाड : शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत

हेमंत पवार
सोमवार, 8 जानेवारी 2018

गमेवाडीतील खमताळ नावाच्या शिवारात दिपक रघुनाथ जाधव यांच्या शेतात आज सकाळी नऊच्या सुमारास शेतकरी गोविंद जाधव हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ऊसाच्या एका सरीत बिबट्या मृत आवस्थेत पडल्याचा दिसला.

कऱ्हाड : गमेवाडी (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील खमताळ नावाच्या शिवारात आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बिबट्याच्या मृत्युच्या पंचनाम्याचे काम सुरु केले असुन मादी बिबट्या असुन तो गरोदर असल्याचेही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गमेवाडीतील खमताळ नावाच्या शिवारात दिपक रघुनाथ जाधव यांच्या शेतात आज सकाळी नऊच्या सुमारास शेतकरी गोविंद जाधव हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ऊसाच्या एका सरीत बिबट्या मृत आवस्थेत पडल्याचा दिसला. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी त्यातुन सावरत संबंधित घटनेची माहिती पोलिस पाटील चंद्रकांत जाधव यांना दिली. जाधव यांनी संबंधित माहिती वन विभाग आणि पोलिस ठाण्यात दिली.

त्यानंतर तातडीने पोलिस उपनिरीक्षक अशोकराव भापकर, हवालदार संग्रासिंह फडतरे, धीरज पारडे, वन विभागाचे वनरक्षक बी. ए. माने, वनपाल ए. आऱ. येळवे, शिबे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची पाहणी केल्यावर त्यांना संबंधित बिबट्या हा गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांचा जमलेला जमाव पांगवला. 

Web Title: Marathi news Satara news leopard death in Karhad