बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी चार महिलांवर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

कोयनावसाहत येथील महिलेने राजेंद्र घारे यांच्याविरोधात शहर पोलिसात बलात्काराची गुन्हा दाखल केला. त्यानंतर 2016 मध्ये रत्नागिरी पोलीस ठाण्यात त्याच महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. दोन्ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत.

कऱ्हाड : बलात्कार, विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी पाच लाख पाच हजार रूपये घेऊन पुन्हा एक लाखांची मागणी करणार्‍या चार महिलांसह पाज जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

राजेंद्र घारे-पाटील (रा. घारेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. संबधित महिलांची नावे समजू शकली नाहीत. मात्र उद्यापर्यंत त्यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोयनावसाहत येथील महिलेने राजेंद्र घारे यांच्याविरोधात शहर पोलिसात बलात्काराची गुन्हा दाखल केला. त्यानंतर 2016 मध्ये रत्नागिरी पोलीस ठाण्यात त्याच महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. दोन्ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. फिर्यादी महिलेसह तिच्या अन्य साथीदार महिलांनी घारे यांना फोन करून भेटण्यास बोलवले. तुमच्या विरोधातील तक्रार मागे घेतो असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली. सुरूवातीला घारे यांनी त्या महिलेस तीस हजार रूपये दिले. त्यानंतर वारंवार एकूण पाच लाख पाच हजार रूपये दिले आहेत. तसे फिर्यादीत नमूद केले आहे. पैसे देऊनही फिर्यादी महिलेने तक्रार मागे घेतली नाही. याबाबत विचारणा केल्यावर महिलांनी आणखी एक लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर घारे यांनी शहर पोलिसात धाव घेतली. त्यांनी खंडणीची फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत. 

Web Title: Marathi news Satara news rape case in Karhad