"सकाळ'च्या नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ एनआयई'च्या वतीने आयोजित "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धा 2018' स्पर्धेस शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत आहे. या स्पर्धा 14 व 15 फेब्रुवारीस येथील शाहू कलामंदिरात होणार आहेत. 

सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ एनआयई'च्या वतीने आयोजित "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धा 2018' स्पर्धेस शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत आहे. या स्पर्धा 14 व 15 फेब्रुवारीस येथील शाहू कलामंदिरात होणार आहेत. 

श्री कैलास फूड इंडस्ट्रीज (अमृतवाडी) हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, तर जंगलहूड, पेस आयआयटी ऍण्ड मेडिकल सातारा आणि कणसे होंडा- ह्युंदाई हे सहप्रायोजक आहेत. ही स्पर्धा सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी खुली आहे. एनआयई उपक्रमात सहभागी असलेल्या शाळांना स्पर्धेतील सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. इतर शाळांसाठी 150 रुपये शुल्क आहे. 

एनआयई आणि इतर उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी "सकाळ'च्या वतीने सातत्याने उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांतील अभिनय गुणांना वाव मिळावा, यासाठी "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धा 2018' आयोजित केली आहे. 

स्पर्धेचे नियम... 
सादर केली जाणारी एकांकिका किमान 30 ते 35 मिनिटांची असावी. मात्र, नेपथ्य लावणे व काढण्यासह 60 मिनिटांत सादरीकरण संपविणे आवश्‍यक आहे. प्रयोगापूर्वी संहितेच्या दोन प्रती संयोजकांकडे जमा कराव्यात. स्टेजवरील कलाकाराचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ध्वनी व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, प्रत्येक संघाने आपली ध्वनी व्यवस्थेची व्यक्ती नेमावी, तसेच पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, सीडी चेक करणे, लावणे ही संघाची जबाबदारी राहील. प्रकाश व्यवस्थेत ठराविक व्यवस्था निःशुल्क असेल. त्याहून अधिक स्पॉट, डीमर, पार हवे असतील तर ऑपरेटरला शुल्क देऊन ते साहित्य घ्यावे लागेल. नेपथ्यातील वस्तू आपल्या आपण आणावयाच्या आहेत. रंगभूषा, वेशभूषा करण्याची व्यवस्था संघाची राहील. स्पर्धा पाहण्यास कोणतेही शुल्क नाही. स्पर्धा दिलेल्या तारखेदिवशी सकाळी 11 वाजता सुरू होईल. शाळांनी प्रवेश आजच निश्‍चित करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धेच्या नियमांचे, आयोजनाचे सर्व अधिकार दै. "सकाळ'कडे राहतील. स्पर्धेतीस सहभागासाठी "सकाळ' कार्यालयात नोंदणी अर्ज भरणे आवश्‍यक आहे. 

विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्हेही 
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांना रोख रक्‍कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक कलाकारास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तसेच दिग्दर्शन, संगीत योजना, प्रकाश योजना, नेपथ्य यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींना रोख बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे. स्पर्धेच्या माहितीसाठी विजय सुतार (मो. 8380092211), चित्रा भिसे (मो. 9922913358) यांच्याशी संपर्क साधावा. 

शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडातील नैपुण्याची जोड असेल, तर जीवन समृद्ध होते. "सकाळ एनआयई नाट्य स्पर्धेत आमचा खारीचा वाटा असावा, यासाठी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 
- दत्तात्रयशेठ बांदल, संचालक, श्री कैलास फूड इंडस्ट्रीज, अमृतवाडी 

Web Title: marathi news satara news Sakal NIE Drama Competition 2018