दहावीच्या विद्यार्थ्यांची तपासणार गुणवत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सातारा - राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) राष्ट्रीय संपादणूक चाचणी (एनएएस)च्या माध्यमातून आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील ८० शाळांमध्ये उद्या (ता. पाच)हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

मागील महिन्यात प्रथम या संस्थेचा १४ ते १८ वयोगटातील मुलांचा शिक्षणविषयक (असर अहवाल) प्रकाशित झाला होता. या अहवालात मुलांचा भागाकार अतिशय कच्चा होता. शिवाय गणित, गुणाकार यासह इतर बाबतींतही निराशाजनक चित्र दिसून आले. यापूर्वी हे सर्वेक्षण खासगी संस्थेमार्फत राबविले जात असल्याने त्यावर आक्षेपही घेतले जात होते.

त्यामुळे आता केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या वतीने यावर्षीपासून राष्ट्रीय संपादणूक चाचणीच्या माध्यमातून दहावीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवतेबाबत पाच फेब्रुवारीला सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 
या सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यातील ८० शाळांची निवड केली आहे. या प्रत्येक शाळेतून जास्तीतजास्त ४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. हे सर्वेक्षण एकाच दिवशी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक व महसूल विभागाचे अधिकारी निरीक्षक म्हणून कामकाज करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी गोपनीय साहित्य वाटप केले जात आहे.

याशिवाय संबंधित सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. 
या सर्वेक्षणाच्या अहवालावरून पुढील शैक्षणिक वर्षात अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून देशभरात एकाच दिवशी हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला देश पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.

दहावीतील विद्यार्थी काय करणार?
सातारा जिल्ह्यातील इयत्ता तिसरीतील गुणवत्ता चांगली राहून राज्यात सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आला; पण पाचवीच्या गणित विषयात सातारा जिल्हा राज्यात सातव्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळे आता होणाऱ्या सर्वेक्षणात दहावीतील विद्यार्थी काय सिद्ध करणार, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. 

तालुकानिहाय शाळांची संख्या
जावळी तीन, कऱ्हाड १५, खंडाळा चार, खटाव आठ, कोरेगाव सहा, माण सहा, महाबळेश्‍वर तीन, पाटण सात, फलटण नऊ, सातारा १४, वाई पाच. त्यामध्ये ३९ मराठी, ३६ सेमी इंग्रजी, चार इंग्रजी, एक उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. 

Web Title: marathi news satara news ssc student quality cheaking