ट्रक कंटेनरची टोलनाका बुथला धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

वहागाव (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावरील बुथमध्ये ट्रक कंटेनर घुसून मोठे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

कंटेनरच्या धक्क्याने टोलचा एक बुथ जमीनदोस्त झाला असून एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनरच्या धक्क्याने टोलच्या बुथसह बुथमधील टोलप्रणालीच्या संगणका, सीसीटीव्ही व इतर आधुनिक यंत्रणेचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी दिली. दरम्यान हा कंटेनर टोलनाक्यात घुसल्यानंतर येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 
 
Web Title: Marathi News Satara News Truck Container Toll Accident