सातारा पोलिसांच्या ताब्यातून सटकलेल्या विश्रुत नवाथेला अटक

प्रवीण जाधव
रविवार, 4 मार्च 2018

साताऱ्यात कारवाया वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  सहा महिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तेव्हा विशृतला पकडण्यात यश आले. न्यायालयीन कोठडीत असताना आजारी पडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून सोडल्यानंतर कारागृहाकडे जात असताना तो सातारा पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता.

सातारा : सातारा पोलिसांच्या ताब्यातून सटकलेल्या विश्रुत नवाथे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घनवट व त्यांच्या पथकाने आज (रविवार) पहाटे अटक केली. धनादेश किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम दिल्याचे दाखवत प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू किंवा गाड्यांची खरेदी करून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याच्या गुन्ह्यात तो पटाईत आहे. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातारा, पुणे, सांगली व कोकणातील जिल्ह्यांमध्ये धनादेश व आरटीजीएसने पैसे देण्याचा बहाणा करत व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचे गुन्हे त्याने केले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तो वावरत होता. मात्र, पोलिसांना सापडत नव्हता. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गाड्यांमध्ये त्याचा जास्त इंटरेस्ट होता. साताऱ्यामध्येही त्याने गौडबंगाल केले होते. फलटण व साताऱ्यातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांना त्याने गंडा घातला.

साताऱ्यात कारवाया वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  सहा महिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तेव्हा विशृतला पकडण्यात यश आले. न्यायालयीन कोठडीत असताना आजारी पडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून सोडल्यानंतर कारागृहाकडे जात असताना तो सातारा पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घनवट यांना मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे त्याला पुण्यात ताब्यात घेतले आणि सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Marathi news Satara news vishrut navathe satara police