किल्ले अजिंक्‍यतारा... अनास्थेचा बळी

शैलेन्द्र पाटील
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

अजिंक्‍यतारा किल्ल्यावर लागलेल्या आगीत केवळ किल्ल्यावरील वाळलेलं गवत आणि झाडंच जळली नाहीत, तर पाखरांची घरटी, सरपटणारे प्राणी आणि कीटक व त्यांची असरास्थळं, किल्ल्याला हरित बनविण्यासाठी श्रमदान चळवळीला हातभार लावणारे शेकडो हात या सर्वांच्या इच्छा- आकांक्षांची राखरांगोळी केली. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषके याच किल्ल्यावर झाला. छत्रपतींचे वस्तीस्थान आणि तख्त राहिलेल्या किल्ल्याबाबत शासन व जिल्हा प्रशासन आणखी किती अनास्था दाखवणार, असा प्रश्‍न आहे. 

जानेवारी २०१३ मध्ये ‘सकाळ’च्या पुढाकाराने अजिंक्‍यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेची ठिणगी पडली. पाहता- पाहता या ठिणगीचे मोठ्या वणव्यात रूपांतर झाले. ही धग आगीची नव्हती तर लोकांनी स्वयंस्फूर्तीने गाळालेल्या घामाची होती. ‘साथी हात बढाना’ म्हणत जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल १८ हजारांहून अधिक नागरिकांनी अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या विकासासाठी श्रमदान केले. कोणी राजवाड्याच्या जोत्यावर वाढलेली झुडपे साफ करून स्वच्छता केली. मातीत गडप झालेली सुमारे एक किलोमिटर अंतराची पायवाट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून शोधून काढली. पुरातण मंदिराची स्वच्छता करण्यात आली... दोन तलावांचे बळकटीकरण झाल्याने कोट्यावधी लिटर पाणीसाठा होऊ लागला. हे तलाव आजही किल्ल्यावरील पशू-पक्ष्यांची तृष्णा भागवत आहेत. दक्षिण दरवाजात गॅलरी उभारून, नव्याने दरवाजाच्या पाकळ्या बसविण्यात आल्या. ऐतिहासिक वास्तूंच्या स्वच्छतेबरोबर चार वर्षांत शेकडो झाडे लावण्यात आली. बंधारे बांधून, सलग समतल चर काढून पावसाळी पाणी जिरविण्यात आले. 

या मोहिमेत ‘सकाळ माध्यम’ हे केवळ निमित्त होते. या मोहिमेस आज चळवळीचे रूप आले. आजही किल्ल्यावर शेकडो लोक शुद्ध हवा, व्यायामासाठी रोज जातात. त्यातील प्रत्येक जण किल्ल्यावरील झाडांची निगा राखण्यासाठी झटताना दिसतो. निसर्गाबाबत लोकांमधील वाढती जागरूकता हे सुचिन्ह दिसत असताना काल (ता. ३१) पान २ वर 

Web Title: marathi news satara news western maharashtra news fort ajinkyatara fire