अपघातामुळे काले गावच 'अाकाश' कोसळलं

संभाजी थोरात
शनिवार, 13 जानेवारी 2018

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमधील घराघरात पैलवान असतो. अापला मुलगा पैलवान व्हावा अस स्वप्न पालक बघत असतात. अशाच परंपरेतील कराड तालुक्यातील काले हे गाव. या गावाने अनेक नामवंत मल्ल राज्याला दिले. नव्या पिढीत परिसरातील कुस्तीक्षेत्रात काले गावचा अाकाश दादासो देसाई हा मल्ल सतत चर्चेत असायचा.

कऱ्हाड : कुस्तीक्षेत्रातील सर्व यश शिखर अापल्या मुलांन पादाक्रांत करावीत अशी स्वप्न उऱाशी बाळगून दिवसरात्र कष्ट करणारया कराड तालुक्यातील काले गावच्या दादासो देसाई यांच्यावर अाज अाकाश कोसळल. त्यांचा मुलगा अाकाश सांगली जिल्ह्यातील वांगी येथे अपघातात मृत्यूमुखी पडला अाणि दादासाो देसाईंच्या सर्व स्वप्न क्षणात संपली. अाकाशच्या जाण्याने देसाई परिवारासह काले गाव एका मोठ्या मल्लाला मुकलं.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमधील घराघरात पैलवान असतो. अापला मुलगा पैलवान व्हावा अस स्वप्न पालक बघत असतात. अशाच परंपरेतील कराड तालुक्यातील काले हे गाव. या गावाने अनेक नामवंत मल्ल राज्याला दिले. नव्या पिढीत परिसरातील कुस्तीक्षेत्रात काले गावचा अाकाश दादासो देसाई हा मल्ल सतत चर्चेत असायचा. शांत स्वभावाच्या अाकाशने कुस्तीचे अनेक फड गाजवले. चटकदार कुस्ती करायचा. उत्तर भारतातल्या पैलवानांसारखी शरीरयष्टी असलेल्या अाकाश जुन्या पिढीतले नामवंत मल्ल सतपालसारखा वाटायचा. घरीची परिस्थिती अत्यंत हालखीची वडील दादासौ देसाई हे थोडीशी वडिलोपर्जित शेती करायचे. अलिकडे शेतीत 
अाकाशचा खुराक अाणि घरच  भागेना म्हणून भाजीपाल्याचा व्यापार करु लागले होते.

अापल्या मुलाने कुस्तीत खूप मोठ यश मिळवाव अस स्वप्न पाहत ते रात्र-दिवस राबव होते. एखादवेऴी अापणाला एखाद घास कमी मिळाला तरी चालेल पण अाकाशला चांगला खूुराक देण्याची त्यांची धडपड होती. अाकाशलाही परिस्थितीची जाणीव होती. साडे सहा फुट उंच अाकाश मनमिळावू अाणि शांत स्वभावाचा होता. तो कुस्तीत खूप मोठ यश मिळवेल अशी कुस्तीतज्ञांनाही खात्री होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हत. दादासो देसाईंनी खूप मोठ्या संघर्षातून उभा केलेला अाकाश एका क्षणात काळाच्या पडद्या अाड गेला. दादासो देसाईंची स्वप्न एका क्षणात भंगल अाणि काले गावावरही शोककळा पसरली.

Web Title: Marathi news Satara news wrestler Akash Deasi dead in accident