कऱ्हाड: आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची आत्महत्या

सचिन शिंदे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सुनील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडला नव्हता. काल रात्री उत्तर तांबवे येथीलच पडक्या घरात त्याचा मृतदेह तुळईला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

कऱ्हाड : उत्तर तांबवे येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाने आत्महत्या केल्याचे काल रात्री निष्पन्न झाले. सुनील व्यंकट जाधव (वय २६) असे संबधिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुनील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडला नव्हता. काल रात्री उत्तर तांबवे येथीलच पडक्या घरात त्याचा मृतदेह तुळईला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तो बेपत्ता होता, त्याच दिवशी त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Marathi news Satara news youth suicide in karhad