धोमबलकवडीचे पाणी अंतिम टप्यात

संदिप कदम
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

फलटण (जि. सातारा) - तालुक्यातील अतिदुर्गम दुष्काळी पट्टयात अनंत अडचणींतर यशस्वीरित्या धोमबलवकडीचे पाणी आणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या भागास दुष्काळाच्या यातनातून मुक्त केले. जावली (ता. फलटण) येथील लिंबबाबा मंदिरापर्यंत पाणी पोहचले आहे. कृष्णामाईची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जावली व मिरढे परिसरातील शेतकऱ्यांनी आज आनंदोत्सव साजरा केला. 

भैरवानाथ मंदिरामागील ओढ्यात सोडण्यात आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे विधीवत पुजन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, धोमबलवकडी कालव्याचे अभियंता घोगरे यांचेसह शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. मागील टप्प्यात दुधेबावीपर्यंत पाणी पोहचले होते. त्यानंतर सहा ते सात किलोमीटरच्या टप्यात बोगद्यांची कामे सुरु असल्याने विलंब झाला होता. यावेळी रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्याचे अभियंता घोगरे, अभियंता शेडगे यांनी बोगद्यांची कामे अल्पवेळेत पुर्ण केली. तर एकूण कालव्याचे 141 किलोमीटर काम पुर्ण झाले असून त्यामधून यशस्वीरित्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चालु आवर्तनामध्ये या पाण्याचा लाभ मिरढे व जावली गावांना घेता आला आहे.

Web Title: marathi news satara water supply water drought