marathi news sharad pawar visit parner
marathi news sharad pawar visit parner

शरद पवार यांच्या भेटीने पारनेर तालुक्यातील गटबाजी मिटेल का?

पारनेर (नगर) - माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त 27 जानेवारीस माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी माजी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष व पक्षाचे तालुक्यातील सर्वेसर्वा सुजित झावरे यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची एकजुट दिसणार की गटबाजी उफाळून येणार याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.       

पवार यांचा दौरा जरी झावरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त असला तरी या दौऱ्यातून पवार तालुक्यातील पक्ष बांधणीचेही कामही यावेळी करतील, असा राजकीय अंदाज आहे. सध्या पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, अशोक सावंत, मधुकर ऊचाळे यांचा एक गट व सुजित झावरे यांचा दुसरा गट असे उघड दोन गट कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले आहेत. याशिवाय महानगर बँकेचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक उदय शेळके यांचाही वेगळाच तांडा असतो. परिणामी पक्षाला तालुक्यात मोठी फुटीची लागण झाली आहे. या फुटीमुळे तालुक्यातील पक्षाचे वर्चस्व दिवसेंदिवस घटू लागले आहे.      

आगामी विधानसभेचा विचार करता ही जागा जरी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे व त्यांनाच मिळेल. मात्र पक्षात अशी फूट कायम राहीली तर त्यांना विजयाच्या आसपासही जाता येणार नाही व विरोधकांना ते फायद्याचे ठरणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठीच व सुजित झावरे यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब करण्यासाठीच खरा हा दौरा नियोजित केला आसल्याचे बोलले जात आहे. सुजित झावरे सध्या संपुर्ण तालुक्यात दौरे करुन व कार्यकर्त्यांना भेटून आग्रहाचे निमंत्रण देत आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारीही सुरु आहे. तसेच कार्यकर्त्यांची एकजूट दिसावी यासाठी पक्षातील जेष्ठ नेते मंडळीही कामाला लागली आहेत. जुने कार्यकर्ते व पक्षातील नाराजांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना एकत्रित आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहेत.     

काही दिवसापुर्वी पवार नगर येथे कार्यक्रमासाठी आले असताना नगर-पुणे महामार्गावर सुपे येथे कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारण्यासाठी थांबले असता ते गेल्यानंतर पक्षाच्या दोन गटात हमरीतुमरी झाली होती. ती घटना थेट पवार यांच्या कानावरही गेली होती. तेव्हापासून या दोन गटात वाद व एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ही बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्यापर्यंत गेली होती. आतातरी पवार यांच्या दौऱ्यातून एकी दिसून येईल का? व पक्षाची पुन्हा एकदा एकत्रित बांधणी होईल का? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com