खंडणीच्या प्रतापापायी साताऱ्याचा विकास खुंटवायचा का? : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सातारा - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्‍यावर "ग्रेड सेपरेटर' उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने हे काम घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे म्हणत "खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का?' असा प्रश्‍न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना भोसले पुढे म्हणाले, "खंडणीखोरांना चाप बसवून साताऱ्याच्या विकासाला गती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत. शांत आणि शिस्तप्रिय साताऱ्यात खंडणीराज कोणामुळे आणि केव्हापासून सुरु झाले? याचा विचार सुज्ञ सातारकरांनी करावा. खंडणी म्हणजे विकासकामांना जडलेला कॅन्सरच आहे. कॅन्सरचा आजार वाढला की उपचारांचा उपयोग होत नाही, हीच परिस्थिती विकासकामांची झाली आहे. विकासकामांना गती देण्यासाठी खंडणी सारख्या गुन्ह्यांचे ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे.'

पोलिस प्रशासनाने खंडणीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी, कोणाचीही गय न करता कठोर पावले उचलावीत, असेही आमदार भोसले यांनी म्हटले आहे.

Web Title: marathi news shivendrasinghraje bhosale maharashtra news toll issue