गुन्हा नोंदवून न घेतल्याने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

संजय काटे
सोमवार, 12 मार्च 2018

श्रीगोंदा (नगर) : बारामती येथील एका कंपनीने फसवणूक केली त्याबद्दल श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाठपुरावा करूनही  गुन्हा नोंदविला जात नसल्याने जगन्नाथ महाराज देशमुख (वय ५५) यांनी आज ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी देशमुख  अटकेत आहेत.

याप्रकरणी समजलेल्या माहितीवरून देशमुख यांनी बारामती येथील एक कंपनीकडून पशुखाद्य पुरवठा करण्यासाठी एजन्सी घेतली होती. मात्र सदर कंपनीने तरीही थेट पुरवठा दाराला माल देताना बिल मात्र देशमुख यांच्या नावे काढले. त्यामुळे देशमुख अडचणीत आल्याने कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती.
पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांनी तो विषय बारामती हद्दीतील असल्याचे सांगत त्यांची फिर्याद घेतली नाही. याप्रकरणी देशमुख यांनी पाठपुरावा केला मात्र उपयोग होत नसल्याने आज दुपारी पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतुन घेण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यांची फिर्याद राहिली बाजूला उलट आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी देशमुख यांच्यावरच गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्यांना अटकही केली.

पोलिस निरीक्षक पोवार यांच्याशी संपर्क झाला नाही मात्र सदर घटनेबाबत त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना हा विषय बारामती हद्दीतील असल्याने आम्ही गुन्हा दाखल केला नाही. सदर व्यक्तीला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा सल्ला काही मान्यवरांनी दिल्याचे तपासात समजले असून देशमुख यांना अटक केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Marathi news shrigonda news nagar FRI not register suicide