खिडकीतून घरात आला गव्हाणी घुबड! 

owl
owl

सोलापूर - भयभीत अवस्थेत अचानक घरात घुबड शिरल्याने सोमवारी येथे खळबळ उडाली. या घुबडाला पुन्हा सुखरूप निसर्गात सोडण्यासाठी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी धडपड केली. हे गव्हाणी घुबड असून, या घुबडाला दिवसा स्पष्ट दिसत नाही. इतर पक्षी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पाठलाग करतात. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी ते घरात घुसले असावे असा अंदाज आहे.   

जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील हॉटेल श्रवण सावजी समोरील सिंदगी बिल्डिंग येथील रहिवासी आणि मेडिकल चालक प्रमोद बसंगर यांच्या घराच्या बाल्कनीत एक घुबड येऊन बसला होता. तो उडत नाही, अशी माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य अमोल मिस्कीन यांना फोनवरून कळविण्यात आली. काही मिनिटांत अमोल व राज गायकवाड दोघे त्याठिकाणी पोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर या घुबडाला सखरुप निसर्गात सोडण्यात आले.

गव्हाणी घुबड 

  • निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका 
  • पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा असतो. - त्यच्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. 
  • पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग, त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात.
  • डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. - चेहऱ्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. - नर-मादी दिसायला सारखेच असतात. 
  • गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. 
  • भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. 
  • हे एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात. 
  • उंदीर, घुशी, सरडे, पाली हे गव्हाणी घुबडाचे मुख्य खाद्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com