राज्यातील सहा हजार अंगणवाडी सेविका मानधनाविना 

संतोष सिरसट
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सोलापूर - राज्य सरकार वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन, मानधन देण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करत आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यासाठी पीएफएमएस प्रणाली सुरू केली आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांचे आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक न झाल्यामुळे सहा हजार 222 अंगणवाडी सेविकांचे मानधन थांबले आहे. त्यांचे मानधन मार्चअखेरपर्यंत जुन्या पद्धतीने करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. 

फेब्रुवारी 2017 पासून प्रायोगिक तत्त्वावर अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण आयुक्तालयास सरकारने दिल्या होत्या. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे "पीएफएमएस' प्रणालीमधून मानधन देणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे जून 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत जुन्याच पद्धतीने मानधन देण्यास सांगितले होते. त्यानंतर तरी ही प्रणाली व्यवस्थित सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही तांत्रिक दोषामुळे ही प्रणाली योग्य पद्धतीने सुरू झालेली नाही. राज्यातील सहा हजार 222 अंगणवाडी सेविकांनी आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांचे जानेवारी ते मार्चपर्यंतचे मानधन त्यांना मिळणे अवघड झाले आहे. सेविकांना वेळेत मानधन मिळण्यासाठी एकीकडे मानधन जुन्या पद्धतीने देत असताना एकात्मिक बालविकास विभागाने विशेष मोहीम राबवून आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काहीही झाले तरी एक एप्रिलपासून राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांचे मानधन "पीएफएमएस' प्रणालीमधूनच करण्यासही सांगितले आहे. 

राज्यातील अंगणवाडी सेविकांची स्थिती 
2 लाख 7 हजार  - मंजूर पदसंख्या 
1 लाख 99 हजार 779  - कार्यरत सेविका 
1 लाख 93 हजार 557  - "पीएफएमएस'तून मानधन मिळणाऱ्या सेविका 
6 हजार 222  -आधार कार्ड लिंक नसलेल्या सेविका 

Web Title: marathi news solapur angawadi