'स्थायी"च्या सभापतीना 'घातवारा'ची भीती

'स्थायी"च्या सभापतीना 'घातवारा'ची भीती

सोलापूर - महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी (ता.2) सभा बोलवण्याचे नियोजन झाले, मात्र त्याचवेळी सभापतींना "घातवारा'चे स्मरण झाले आणि चिठ्ठी सोडतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलण्यात आला. आता ही सभा शनिवारी (ता.3) होणार आहे. 

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. शुक्रवारच्या सभेसाठी हा विषय "अजेंड्या'वर घेण्यात आला होता, मात्र "घातवारा'चा "मेसेज' आला आणि दिवस बदलला. त्याची चर्चा सुरु झाल्यावर सारवासारवी झाली. "शनिवारी' सभापतीपदी निवड झाली होती, त्यामुळे तो दिवस शुभ असल्याचे सांगून नवीन सभा शनिवारी काढण्याचे फर्मान निघाले. त्यानुसार उद्या (मंगळवारी) आणखी एका सभेचा अजेंडा निघणार आहे. 

स्थायी समितीमध्ये सभापती संजय कोळी, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मनिषा हुच्चे, राजेश्री बिराजदार, मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर व विठ्ठल कोटा (शिवसेना), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (कॉंग्रेस), आनंद चंदनशिवे (बहुजन समाज पक्ष), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लीम शेख (एमआयएम). 

असे आहे पक्षीय बलाबल..
भाजप - 08 
शिवसेना - 03 
कॉंग्रेस - 02 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 01 
बसप - 01 
एमआयएम - 01 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com