महापालिका उर्दू शाळा शंभर टक्के "डिजीटल' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले. 

उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते सातवीपर्यंत 2220 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्दू माध्यमातील 80 शिक्षकांनी आपापला सहभाग नोंदवित 2 लाख 17 हजार रुपये गोळा केले. त्यातून पंधरा एलईडी टीव्ही खरेदी करण्यात येऊन त्याचे वाटप करण्यात आले. 

मंगळवार बाजार परिसरात असलेली उर्दू शाळा महापालिकेची राज्यातील पहिले "टॅबस्कूल' झाली. राज्यस्तरीय प्रदर्शनातही या शाळेचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. टॅब स्कूल होण्याआधी या शाळेत फक्त 30 विद्यार्थी होते, आजच्या घडीला 160 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांनी प्रास्ताविकेत सांगितले. झीनत पगडीवाले व नाझनीन कोरबू यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक मुमताज शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फय्याज शेख, फजल अहमद शेख, सादीक बागवान, शफीक खान, अमीर सय्यद, अफरोज बागवान, फुरकान पानगल, शाहबाज काझी, मुदस्सर पीरजादे यानी परिश्रम घेतले. 

विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणही आवश्‍यक आहे. डिजीटल स्कूलच्या माध्यमातून महापालिका शाळांनी त्याची सुरवात केली याचा आनंद वाटतो. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 

शहर विकासाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही सुधारणा झाल्या पाहिजेत. उर्दू माध्यमातील शिक्षकांनी केलेले काम सर्वांसाठीच आदर्शवत आहे. 
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त 

Web Title: marathi news solapur municipal urdu medium school LED TV education