ट्रॅक्टरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

विजयकुमार कन्हेरे
शनिवार, 3 मार्च 2018

कुर्डुवाडी (सोलापूर) : येथील बाह्यवळण रस्त्यावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरने  दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली. जाकीर रमजान पठाण (वय १९ रा. सापटणे भो, ता माढा) असे मृत युवकाचे नाव आहे.   

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जाकीर हा कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रथम वर्षाला टूल्स अँड डायमेकरचे शिक्षण घेत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो (एम एच ४५ एच २७१२) वरुन  बाह्यवळण रस्त्यावरुन सापटणे येथे घरी चालला होता. बाह्यवळण रस्त्यावरील माढा रस्त्यावरील पूलावर उताराच्या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पाठीमागुन धडक दिल्याने दूचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला व जागीच ठार झाला. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Marathi news solapur news accident student dies bypass