पाणीप्रश्नी, सत्ताबदलाने या योजनेस निधी मिळाला नाही - आ. भालके

हुकूम मुलाणी 
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा (सोलापूर) : पाण्याअभावी तालुक्यातील 35 गावातील दुष्काळी जनतेच्या जगण्यातील हाल आपेष्ठा व त्यांच्या भावनेचा विचार शासनाने न केल्यामुळे न्यायालयाने याचिकेतून या लोकांच्या परिस्थितीचा विचार करून योग्य न्याय दिला. असल्याचे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले. 

मंगळवेढा (सोलापूर) : पाण्याअभावी तालुक्यातील 35 गावातील दुष्काळी जनतेच्या जगण्यातील हाल आपेष्ठा व त्यांच्या भावनेचा विचार शासनाने न केल्यामुळे न्यायालयाने याचिकेतून या लोकांच्या परिस्थितीचा विचार करून योग्य न्याय दिला. असल्याचे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले. 

आ. भालके यांनी मंगळवेढ्यातील कार्यालयात पत्रकाराशी वार्तालाप करताना वरील मत व्यक्त केले. आ. भालके म्हणाले की, तालुक्यातील जनतेने मला आमदार केले ते या भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करून या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवली पण सत्ताबदलाने या योजनेस निधी मिळाला नाही. साडेतीन वर्षे आपले प्रयत्न सुरूच होते शाळेत अभ्यास केला नाही, एवढा अभ्यास 35 गाव पाणी प्रश्नी केला. माझ्या आजारपणात व दवाखाना याकडे लक्ष न देता या दोन महिन्यात माझ्या गाडीतही या योजनेचीच फाईल होती. तरीही विरोधक आमदार कामाच्या बाबतीत निष्क्रिय आहे असे म्हणतात. मी सातत्याने पाणीप्रश्नी पाठपुरावा करत होतो हेही तमाम जनतेला माहित आहे. तर मी केलेल्या कामावर व न्यायदेवतेवर विश्वास होता त्यामुळे या निकालाबाबत आता विरोधक शांत आहेत.  

सत्ताधारी शासनाच्या दुर्लक्षामुळे भागातील जयसिंग निकम, हर्षराज बिले, दिनेश पाटील व अन्य महिला भगीनीनी याबाबत जनहीत याचिका दाखल केली होती. यात शासनाच्या वतीने टोकन निधी, पर्यावरणाच्या अडचणी व निधी देण्याबाबत प्रतिज्ञापत्र देण्यात आले. न्यायालयाने शासनाला चपराक दिली. पण या भागातील पाणीप्रश्नी इतरांनी टिंगल केली त्यांनी प्रयत्न करायला हवे होते किंवा त्यांनी पुढे झाले तर मी त्यांच्या मागे जायला तयार होतो. माझी आर्थिक ताकद नसली तरी जनतेच्या मनात असलेली माझी ताकद मोठी आहे. त्यामुळे मला राजकीय वारसा नाही किंवा यापुर्वी घरातील कोणही आमदार नाही त्यामुळे माझ्यासाठी आमदारकी महत्त्वाची नव्हती या भागातील जनतेला वाय्रावर न सोडता त्यांना दिलेल्या शब्दासाठी मला प्रयत्न करावे लागले. यापुढील काळातही पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करून एकदाच एवढा निधी मिळावा यासाठी लढा या भागातील जनतेच्या माध्यमातून सुरूच ठेवणार असल्याचे मत आ. भालके यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील दुष्काळी गावातून आ. भालके समर्थकांनी स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

 

Web Title: Marathi news solapur news bhart bhalke water shortage