बोथट सामाजिक संवेदना समाजासाठी घातक : मोहन पालेशा

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 2 मार्च 2018

भिगवण : 'समाजामध्ये विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. सामाजिक विषमतेतून, असुरक्षितता, असुरक्षिततेमधुन संचय करण्याची वृत्ती व संचयवृत्तीतुन बोथट सामाजिक संवेदना अशा चक्रामध्ये माणूस अडकला आहे. बोथट सामाजिक संवेदना ही कोणत्याही समाजासाठी घातक असून समाजाला त्यामधून बाहेर काढण्याचे आव्हान मानवतावादी सामाजिक संघटनांपुढे आहे', असे मत पुणे रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी व्यक्त केले.

मदनवाडी (ता.इंदापुर) येथे येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'सामाजिक संवेदना' या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, अध्यक्ष नामदेव कुदळे, उपाध्यक्ष संपत बंडगर, सचिव वर्षा बोगावत माजी अध्यक्ष रियाज शेख उपस्थित होते.

पालेशा पुढे म्हणाले, ''राजकारणांमध्ये तत्वाचा व शिक्षण क्षेत्रामध्ये चारित्र्याचा अभाव असे चित्र सध्या दिसत आहे. सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला असून मी, माझी बायको व माझे कुटुंब अशी त्याची वृत्ती झाली आहे. स्वकेंद्रीवृत्तीमुळे समाजातील प्रश्न कधी आपल्या कुटुंबापर्यत येऊन पोचतील, हे कळणारही नाही. वाढते वृध्दाश्रम सामाजिक संवेदना बोथट होत असल्याचे लक्षण आहे. वृध्दाश्रमे बंद होण्याऐवजी आत्ता पंचतारांकित वृध्दाश्रमांची संकल्पना पुढे येत आहे, ही दुर्दवी बाब आहे. यावेळी शायरी व कवितांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. 

त्यांनी सादर केलेल्या 'आईची साथ" कवितेतील

'महिन्यांमागून महिने गेले शेवटी वर्ष सरुन जाते,
वृध्दाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते,
भिजुन जातो पदर अन् मन रिते राहते कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते,
पैसै नकोत यावेळी तुच येऊ जा बाळा मला तुझ्या घरी घेऊ जा"

या ओळींनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

यावेळी बोलताना सचिन बोगावत म्हणाले, मोहन पालेशा हे मागील तीस वर्षांपासून रोटरी क्लबच्या माध्यमातून उपेक्षित घटकांची सेवा करण्याचे काम करत आहे. त्यांचे सामाजिक संवेदना या विषयावर व्याख्यान हे मागील तीस वर्षाच्या अनुभवाचे संचित आहेत.

प्रास्ताविक संपत बंडगर यांनी केले. सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले तर आभार संजय चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भिगवण रोटरी क्लब, नेचर फाऊंडेशन व सायकल क्लब आदीसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: marathi news Solapur News Bhigvan pune rotary club