सोलापूर: मंद्रुपच्या सिध्देश्वर यात्रेत स्फोट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

एका महिलेने डोळा गमावल्याचे सांगण्यात आले. जखमींना घेऊन सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूकीची कोंडी होऊन विजापूर-सोलापूर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प होती. गावातील दुर्घटनेनंतर तरुणांनी लगबगीने जखमींना उपचारासाठी हलवले.

सोलापूर : मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील सिध्देश्वर यात्रेत शोभेच्या दारुकामावेळी स्फोट होऊन अनेक भाविक जखमी झाले. 

यात्रेतील शोभेच्या दारुकामावेळी एक आउट गोळा वरुन खाली आला आणि शोभेच्या दारुच्या बॉक्सवर पडला. त्यामुळे स्फोट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर गोंधळ उडाला. मंद्रुप आणि परिसरातील जवळपास दीड ते दोन हजार लोक दारुकाम पाहण्यासाठी आले होते. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्या मोठी होती. या घटनेतील जखमीपैकी २५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. 14 जणांना गावात उपचार तर 7 जणांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत.

एका महिलेने डोळा गमावल्याचे सांगण्यात आले. जखमींना घेऊन सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूकीची कोंडी होऊन विजापूर-सोलापूर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प होती. गावातील दुर्घटनेनंतर तरुणांनी लगबगीने जखमींना उपचारासाठी हलवले.

Web Title: Marathi news Solapur news blast in mandrup

टॅग्स