महिलांनी संगणक साक्षर व्हावे : शीलाताई शिवशरण

हुकूम मुलाणी
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा (पुणे) : ‘संगणकयुग’ असलेल्या 21 व्या शतकात कर्तृत्वाच्या बळावर आघाडीवर असणाऱ्या महिलांनी संगणक शिक्षण घेऊन कौटुंबिक विकास साध्य करावा असे मत  समाजकल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त  केले.

मंगळवेढा (पुणे) : ‘संगणकयुग’ असलेल्या 21 व्या शतकात कर्तृत्वाच्या बळावर आघाडीवर असणाऱ्या महिलांनी संगणक शिक्षण घेऊन कौटुंबिक विकास साध्य करावा असे मत  समाजकल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त  केले.

तालुक्यातील मरवडे येथील सिलीकॉन कॉम्प्युटर्स व  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण विभाग यांच्यावतीने नोहेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत महिला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MS-CIT या अद्ययावत संगणक साक्षरता कोर्सचे मोफत प्रशिक्षण या योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण योजनेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिवाजीराव पवार, ज्ञानेश्वर बनसोडे, इंद्रजीत पवार, सचिन येडसे, सिलीकॉन कॉम्प्युटर्सचे संचालक योगेश तेली  नितीन गायकवाड, गोरख बेलदार,किरण भोसले, प्रतिक पाटील,शिवानंद कित्तूर, गणपती कळ्ळी,विद्यार्थी, पालकवर्ग व नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना समाजकल्याण सभापती शिलाताई शिवशरण म्हणाल्या की संगणक हे प्रत्येकाच्या घरी पोहचले असून पुस्तकी ज्ञानाबरोबर संगणक ज्ञानही आवश्यक आहे. त्यामुळे जगातील कोणतीही माहिती एका क्लीकवर मिळत आहे.आणि त्यामधून टाईमपास न होता  रोजगार ही मिळत आहे.

याप्रसंगी दामाजी शुगर्सचे संचालक सचिन शिवशरण यांनी मरवडे सारख्या ग्रामीण भागात गेल्या ६ वर्षापासून MKCL मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक प्रशिक्षण देणारी संगणक प्रशिक्षण संस्थेतुन महिलांन  संगणक निक्षणाची सोय झाली त्याचा लाभ पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी, महिलांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी या संस्थेमार्फत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश तेली सर यांनी केले तर आभार सुजित काटे यांनी मानले. 

Web Title: Marathi news solapur news computer literate women