सरकारविरोधातील नाराजीचा फायदा उठविण्यात काँग्रेस अपयशी

हुकूम मुलाणी
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पंधरा वर्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाराचा पाढा जनतेसमोर वाचून जनतेचे मन मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षाच्या तीन वर्षातील लोखा जोखा जनतेसमोर ठेवून जनतेच्या त्यांच्याविरोधीत मत तयार करुन जेणेकरुन भविष्यात कॉग्रेसला फायदा होईल. यांच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. तीन तालुक्यात नवीन शाखा सुरु करण्यात आल्या नाहीत.

मंगळवेढा : केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या कारभाराची नाराजी जनतेमधून व सोशल मिडीयामधून व्यक्त होत असताना या नाराजीचा लाभ घेण्यात मंगळवेढयातील काँग्रेस अपयशी ठरली असल्याचे दिसत आहे. आमदार भालके यांच्या रुपाने दमदार नेतृत्व व कार्यकर्ते मिळाले असताना, तालुक्यातील पदाधिकारी भविष्यात काँग्रेसला लाभ होणाच्या दृष्टीने सरकारच्या कारभाराची नाराजीचा जनतेपर्यत नेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.

पंधरा वर्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाराचा पाढा जनतेसमोर वाचून जनतेचे मन मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षाच्या तीन वर्षातील लोखा जोखा जनतेसमोर ठेवून जनतेच्या त्यांच्याविरोधीत मत तयार करुन जेणेकरुन भविष्यात कॉग्रेसला फायदा होईल. यांच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. तीन तालुक्यात नवीन शाखा सुरु करण्यात आल्या नाहीत. नवीन पदाधिकारी जोडण्यात आले भालके गटाच्या रुपाने काँग्रेसला कार्यकर्ते आयते उपलब्ध झाले असताना त्यांच्या माध्यमातून सत्ताधाय्राची जनतेपर्यत नेता येईना तालुक्यात विजेचे भारनियमन, 35 गाव पाणी योजना, पिण्याचे पाणी, बेरोजगारांना काम, शेतीमाला योग्य दर, शेतकरी कर्जमाफी, तालुक्यातील काही गावाला पिक विम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. आरक्षण यासह अनेक योजना सत्ता दिल्यानंतर मार्गी लावण्याचे आश्‍वासन निवडणूकीपुर्वी देण्यात आले. पण त्याची तीन वर्षानंतरही पुर्ती होताना दिसत नाही. याचा लाभ घेण्याची संधी मंगळवेढयातील कॉग्रेस नेत्यांना भालके यांनी दोन वर्षापुर्वी प्रांत कार्यालयावर शेतकय्रांच्या मागण्याबाबत मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर एकही आंदोलन कॉग्रेसच्या वतीने करण्यात आले नाही.

दोन्ही कॉग्रेसच्या संघर्ष यांत्रेला शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. भालके यांच्या प्रयत्नाचे 2015 चा दुष्काळ निधी आता मिळाला तालुक्यावर सत्ताधारी निधी देण्याबाबत करीत असलेला अन्याय तालुक्यातील एमआयडीसी गॅस न देता जमा झालेले अनुदान, गॅस घेवूनही न जमा होणारे अनुदान, शहरातील चोऱ्याचा तपास करण्यास अपयशी ठरलेली यंत्रणा, विजेचे भारनियमन, तीन वर्षात विविध योजनेला न मिळालेला निधी यासह अनेक प्रश्‍न भालके यांनी तारांकीत करुन विधानसभेत आवाज उठविला, तसा आवाज तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन उठविणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने हल्लाबोल आंदोलन करुन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला, पण तालुक्यातील कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या नाराजी लाभ घेण्याच्या कोणतेही आंदोलन अलिकडच्या काळात केले नाही. दृष्टीने जनतेमध्ये गेले पाहिजे याचा पुढील विधानसभेसाठी काॅग्रेसला मताच्या रूपाने होवू शकतो.

Web Title: Marathi news Solapur news Congress in Mangalwedha