'आमच्या बाळाला जात लावणार नाही'

अशोक मुरूमकर
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

आरती अहमदनगरची तर विकास कांबळे हा करमाळा तालुक्यातील (कामोणे) आहे. दोघांचं एमएसडब्ल्यू झालं आहे. आरती म्हणते, प्रेम तर कोणीकोणावरही करते. काहींचे प्रेम क्षणिक व काहींचे भावनिक असतं. प्रेमातून जातीअंत होईल या भावनेतून ठरवून मी विवाह केला.

सोलापूर : प्रेम आंधळ अासतं.., प्रेमात अन् युद्धात सर्वकाही माफ अासतं... आडीच अक्षराच्या प्रेम या शब्दाबाबत कवींनी व प्रेमवीरांनी असं बरचं काहीकाही म्हटलं आहे. प्रेम कायम टिकावं म्हणून काहीजण शपथा घेतात... काहीजण वेगवेगळी वचनं देतात... एका जोडीनेही अशीच शपथ घेतली ती प्रेमातून जातीअंत करण्याची. त्यासाठी संघर्ष करत त्यांनी आंतरजातीय विवाह केला. आरती व विकास असं त्या जोडीचं नाव आहे. 'व्हेलेटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेमकाहणीचा उलगडा केला.

आरती अहमदनगरची तर विकास कांबळे हा करमाळा तालुक्यातील (कामोणे) आहे. दोघांचं एमएसडब्ल्यू झालं आहे. आरती म्हणते, प्रेम तर कोणीकोणावरही करते. काहींचे प्रेम क्षणिक व काहींचे भावनिक असतं. प्रेमातून जातीअंत होईल या भावनेतून ठरवून मी विवाह केला. प्रेमात जात- धर्म पाहू नये. मी प्रेम केलं ते विवाह करण्यासाठीच जात पाहीलीच नाही. शिक्षणामुळे सामाजिकतेचं भान होतं. विवाह करण्यासाठी विरोध होऊ लागला पण मी मतावर ठाम होते. समाज हा दोन्ही बाजूने नावं ठेवतो. त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. शिकलेली पिढीच हे करु शकते. कारण फक्त आंतरजातीय विवाह केला म्हणजे सर्व जातीअंत होईल असं नाही. त्यात यशस्वी व्हावं लागतं. त्यासाठी समंजस्पणा महत्त्वाचा आसल्याचे आरती म्हणत आहे.

विकास म्हणतोय माझ्या घराची तशी परस्थिती तशी सर्वसाधारणच. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी गेलो. वाचनाने सामाजिकतेचं भान आलं. त्यामुळे आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला. मिञमंडळी यासाठी ठामपणे मागे राहिली. समाज, नातेवाईक काय म्हणतील? या विचारातून घरच्यांकडून विरोध होतहोता. काही दिवस हा ञास होणारचं हे आम्ही गृहीत धरलेलंच होतं. आमचा विवाह होऊन वर्ष झालं. हळुहळु आम्हाला स्विकारलं आहे. प्रेम करताना जात पाहिली जात नाही मग विवाह करताना का ती पाहायची असं विकास म्हणतोय.
विकास नगर जिल्ह्यातील राशीन येते नोकरी करत आहे. तर आरती ही गृहिणी आहे. त्यांना एक बाळ आहे. त्याला जात लावणार नसल्याचे ही जोडी सांगत आहे.
( फोन नंबर : 80072 95626)

Web Title: Marathi news Solapur news couple in solapur