पिकांना मिळाली साड्यांची सावली

राजकुमार शहा 
गुरुवार, 1 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर) : सध्याच्या वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासुन द्राक्ष डाळींब या फळबागांसह ढोबळी मिरची, कलींगड, खरबुज या वेलवर्गीय पिकांना वाचविण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी पॉलीहाऊसला पर्याय म्हणुन पापरी (ता. मोहोळ) येथील चाणाक्ष शेतकऱ्यांनी जुन्या साडयांचा वापर करुन मांडवा प्रमाणे त्याची बांधणी करुन पर्याय शोधला आहे त्यामुळे सोलापुर शहरातील जुन्या साडया विकणाऱ्या व्यावसायीकांना अच्छे दिन आले आहेत. 

पापरी परिसर म्हणजे आष्टी जलाशय व उजनी डाव्या कालव्यामुळे संपुर्ण बागायती झाला आहे. त्यात चालु वर्षी चांगला पाऊस झाल्याने विहीरीला ही बऱ्यापैकी पाणी आहे त्यामुळे द्राक्ष बागेसह ढोबळी मिरची कलींगड खर बुज  भोपळा या वेलवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे सध्या द्राक्ष बागेवर घड आहेत तर वेलवर्गीय पिक फलधारणेच्या अवस्थेत आहेत. 

गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे उन्हामुळे द्राक्षाच्या घडावर परिणाम होत आहे. तर वेलवर्गीय पिकांना लागलेल्या कळ्या फुले सुकु न गळु लागली आहेत पापरी परिसरातील शेतकरी प्रयोगशिल आहेत. शासनाची शेतकऱ्यासाठी पॉली हाऊस योजना आहे. पण तरी सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन शेतकऱ्यांनी शिल्लक असलेले जुने बांबु व कमी पडल्यास नवीन विकत घेऊन जुन्या साड्या खरेदी करून संपुर्ण पिकावरच मांडव करुन सावली केली आहे. त्यामुळे कमी खर्चात व कमी वेळेत उदीष्ट साध्य होत आहे. त्यासाठी सोलापूर येथील जुन्या बाजारातुन जुन्या साडया खरेदी करणे सुरु केले आहे. एका साडीची किंमत तीच्या दर्जानुसार दहा ते पंधरा रुपये आहे एकरी साधारण दिड हजार साड्या लागतात शेतकऱ्यामुळे सोलापुरातील जुन्या साडया व्यवसायीकांना अच्छे दिन आले आहेत.

हे होतात फायदे -
1. ठिबक सिंचनाच्या माध्यमातुन पिकांना दिलेल्या पाण्याच बाष्पीभवन थांबते
2. जमीन ओल सोडत नाही वापशावर राहते 
3. ओल न सोडल्याने पाण्याची बचत 
4. पिकांच आरोग्य चांगले राहण्यासाठी सारखी करावी लागणारी टॉनिक च्या फवारणीत घट 
5. साडया बांबु मजुर मिळुन एकरी ऐंशी हजाराचा खर्च त्यामुळे पॉली हाऊसच्या तुलनेत खर्चात मोठी बचत 
 
Web Title: Marathi news solapur news crops summer saree