मोहोळ: वडवळ लोकवर्गणीतून उभारण्यात आले भक्तनिवास

राजकुमार शहा 
रविवार, 11 मार्च 2018

वडवळ हे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासुन पाच किमी अंतरावरील नागनाथांचे देवस्थान आहे. संपुर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या या नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आमावस्ये दिवशी लाखो भाविक हजेरी लावतात. जागृत देवस्थान म्हणुन या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. वरचेवर भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढत आहे.

मोहोळ : वडवळ (ता. मोहोळ) येथील सव्वा कोटी रुपये लोकवर्गणीतुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे उद्घाटन अन्नछत्र व प्रसादालयाच्या इमारतीचे भुमिपुजन हिरेमठ (गौडगाव) संस्थानचे शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते बुधवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती नागनाथ देवस्थान पंचकमेटीच्या वतीने देण्यात आली.

वडवळ हे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासुन पाच किमी अंतरावरील नागनाथांचे देवस्थान आहे. संपुर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या या नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आमावस्ये दिवशी लाखो भाविक हजेरी लावतात. जागृत देवस्थान म्हणुन या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. वरचेवर भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरा शेजारील दोन एकर जागेवर 10 हजार स्केअर फुटाचे सव्वा कोटी रूपये लोकवर्गणीतुन प्रशस्त भक्तनिवास उभारण्यात आले आहे.

यामुळे येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय झाली आहे. भक्तनिवासात चौदा स्वच्छता चौदा स्नानगृह बांधण्यात आली आहेत. या सुविधेमुळे एकावेळी 500 ते 600 भाविकांच्या राहण्याची सोय झाली आहे. भविष्यात भक्तनिवासा जवळच प्रसादालय अन्नछत्र व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभु तत्कालीन तहसीलदार बी. आर. माळी, तहसीलदार मेधा ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, श्रीकांत पाडुळे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Marathi news Solapur news devotee mohol