मोहोळ; शेती पंपांची वीज तोडल्याने करपल्या फळबागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

गेल्या 2 वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत आला आहे. चालु वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी विविध पिके केली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांकडे महावितरणची दोनशे कोटींची थकबाकी आहे.

मोहोळ : थकित विजबिलाच्या वसुलिसाठी महावितरणने मोहोळ तालुक्यातील 500 ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून 3 हजार शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडण्या तोडल्या असून या कारवाईमुळे मका, कडवळ, भुईमुग या पिकांसह डाळींब, बोर, केळी या फळबागा जळू लागल्या आहेत. तर खरबूज कलिंगड काकडी ही वेलवर्गीय पिके जागीच करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून त्वरित वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी होत आहे.

गेल्या 2 वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत आला आहे. चालु वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी विविध पिके केली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांकडे महावितरणची दोनशे कोटींची थकबाकी आहे. मात्र दोन वर्षांच्या दुष्काळामुळे पाणी नसल्याने मोटारीच फिरल्या नाहीत. त्यामुळे महावितरणने न वापरलेल्या विजेचीही बिले शेतकऱ्यांवर लादली आहेत. गेल्या आठवड्यापासून महावितरणचे अधिकारी जीपद्वारे ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून विज बिले भरण्याचे आवाहन करीत आहेत.

दरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पड़ळकर हे विज बिल वसुलीच्या आढाव्यासाठी मोहोळ येथे आले होते. त्यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, सध्या महावितरण ना नफा ना तोटा या तत्वावर विज पुरवठा करीत आहे. जिल्ह्याला दरमहा 530 दशलक्ष यूनिट विज लागते. त्या माध्यमातून 200 कोटींची विज आपन विकत घेतो. वसूलीमात्र 70 ते 80 टक्के होते, मोबाईल प्रमाणे आता विजमीटरही प्रीपेड करण्याचा विचार वरिष्ट पातळीवरुन सुरु असून विज वितरण कंपनी आपली आहे, असे समजून शेतकऱ्यांनी विज बिले भरण्याचे आवाहन पडळकर यांनी केले. यावेळी मोहोळचे सहाय्यक अभियंता अनिल अंकोलीकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Web Title: Marathi news Solapur news electricity farmers