पहिली, आठवी, दहावीचा अभ्यासक्रम बदलणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सोलापूर - येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून पहिली, आठवी व दहावी या तीन वर्गांचे अभ्यासक्रम बदलणार आहेत. त्याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी पुस्तक विक्रेते व शाळांना तशाप्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

पहिली, आठवी, दहावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर त्याच्या पाठ्यपुस्तकाबाबत अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांना कळविण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. अभ्यासक्रम बदलणार असल्याने शाळांनी ती पुस्तके विकत घेऊ नयेत, यासाठी हे परिपत्रक काढले आहे.

त्याचबरोबर जून 2019 पासून म्हणजेच पुढील वर्षापासून दुसरी, तिसरी व अकरावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. यंदाच्या वर्षी दुसरी, तिसरी व अकरावीच्या पुस्तकांचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे या इयत्तांची पुस्तके खरेदी करताना पालकांनी व शैक्षणिक संस्थांनी आवश्‍यक तेवढ्याच प्रमाणात खरेदी करण्याचे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाने केले आहे.

Web Title: marathi news solapur news first eight ten syllabus change