येणारा काळ महिलांचा : हेमामालिनी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

''आजची महिला आबला नाही तर सबला आहे. पुरुष महिलांना दाबून ठेवतात. मात्र, महिला आता फार काळ दबून राहणार नाहीत. पुरुषांचा मान ठेऊन त्या पुढे जाणार आहेत. येणारा काळ महिलांचाच असेल''.

- अभिनेत्री हेमा मालिनी

सोलापूर : ''आजची महिला आबला नाही तर सबला आहे. पुरुष महिलांना दाबून ठेवतात. मात्र, महिला आता फार काळ दबून राहणार नाहीत. पुरुषांचा मान ठेऊन त्या पुढे जाणार आहेत. येणारा काळ महिलांचाच असेल'', असा विश्वास अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केला.

पतंजलीच्या वतीने सोलापूरमध्ये झालेल्या महिला महामेळाव्यात हेमा मालिनी बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, योगगुरू रामदेवबाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, आजच्या युगातील महिला आबला नाहीतर सबला झाल्या आहेत. मात्र, पुरुष त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. हे फार काळ चालणार नाही. महिला पुरुषांचा मान ठेऊन पुढे जाणार आहेत. तसेच येणारा काळ महिलांचाच असेल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पतंजलीची उत्पादने बंद करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

Web Title: Marathi News Solapur News Future is For Women says Hema Malini