स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी महिला सरपंचाकडून प्रबोधन

राजकुमार शहा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जिल्ह्यात अशी योजना सुरू करणारी देवडी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. यामुळे समाजातील स्त्रीभुण हत्या कमी होण्यास थोडी तरी मदत होईल. तर मुलींचा जन्म दर वाढणार आहे.
- दीपक शेळके ( ग्रामसेवक )

मोहोळ : शासनाने वेळोवेळी कडक निर्बंध घालुनही समाजात अद्यापही स्त्रीभुण हत्या सुरुच आहेत. याचे प्रमाण ग्रामीण भागात जादा आहे. मुलगी जन्मली म्हणाले, की त्या मुलीच्या आईला बघताच घरात नाक मुरडणे, घालुन पाडुन बोलणे असे प्रकार सुरू होतात. त्यांना मुलाच्या रुपाने वंशाला दिवा पाहिजे असतो. मात्र, अशाही कठीण परिस्थीतीत देवडी (ता मोहोळ) येथील महिला सरपंच अश्विनी सचिन थोरात या मुलीचा जन्मदर वाढावा समाजात मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी गावातील नागरीकांचे प्रबोधन करण्याची धडपड करतात. 

ग्रामपंचायतीच्या करातुन सर्व खर्च भागुन शिल्लक राहीलेल्या रकमेतुन एक जानेवारी पासून तेजस्वीनी सुकन्या योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातुन जन्मलेल्या मुलीच्या नावाने 1818 रुपयाची मुदत ठेव ठेवुन ती पावती मुलीच्या आईला प्रदान करतात. या योजनेस गावातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे, असा उपक्रम राबविणारी देवडी ही जिल्हयातील एकमेव ग्रामपंचायत आहे.

या संदर्भात माहिती देताना सरपंच श्रीमती थोरात म्हणाल्या, मी माहिला आहे वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच पाहीजे. या अंधश्रदेला माझा विरोध आहे. आपण एकवीसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. शासन स्तरावर ही माहिलांना मोठा सन्मान मिळतो. मग हे बुरसटलेले विचार कशासाठी, शिवाय मुलगी दोन्ही घरी दिवा लावते. या सर्व गोष्टीचा विचार करुन मी तेजस्वीनी सुकन्या योजनेची संकल्पना सर्व ग्रामपंचायत सदस्यासमोर मांडली. सर्वानी तिला होकार दिला. एक जानेवारी 2018 पासून जी मुलगी जन्माला येईल, तिच्या नावाने 1818 रुपयाची मुदत ठेव ठेवुन ती पावती तिच्या आईकडे सुपुर्द करावयाची.

ठेव पावती 1818 चीच का त्या पाठीमागचे कारण विचारले असता, मुलगी 18 वर्षाची होई तोपर्यंत ती रक्कम व्याजासह सुमारे दहा हजार रुपये होते. तसेच 18 व्या वर्षी तीन आपला मतदानाचा हक्क बजावावा हा विचार त्या मागचा असल्याचे सांगितले. या योजनेच्या माहीतीस्तव गावातुन प्रबोधन पत्रके तयार करून वाटली आहेत. या कामी ग्रामसेवक दिपक शेळके उपसरपंच मिथुन अभिवंत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी सहकार्य करीत असल्याचे सरपंच थोरात यांनी सांगितले. 

जिल्ह्यात अशी योजना सुरू करणारी देवडी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. यामुळे समाजातील स्त्रीभुण हत्या कमी होण्यास थोडी तरी मदत होईल. तर मुलींचा जन्म दर वाढणार आहे.
- दीपक शेळके ( ग्रामसेवक )

Web Title: Marathi news Solapur news girl birth