सोलापूरमध्ये शासकीय विश्रामगृहात एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सोलापूर : शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 14 मध्ये एकाने
आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्री (ता.16) ते शुक्रवार (ता.17)
सकाळ दरम्यान घडला. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात करण्यात आली
आहे.

भानुदास सोपान शिंदे (वय 61) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भानुदास शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई म्हणून कामास होते. ते
शासकीय विश्रामगृह येथे नेहमीच त्यांचे येणे -जाणे असायचे.

संत रोहिदासमहाराज यांच्या जयंती निमित्त सोलापुरात पाहुणे येणार असून त्यांना
राहण्यासाठी त्यांनी विश्रामगृहातील खोली घेतली होती. शुक्रवारी बराच वेळ
झाला तरी त्यांची खोली न उघडल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना
कळविले. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

भानुदास शिंदे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून यात आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तिघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. भानुदास शिंदे हे महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष होते.

Web Title: marathi news solapur news government rest house suicide