राज्यातील १८ महापालिकांना जीएसटी अनुदान मंजुर

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 6 मार्च 2018

अनुदान मंजुरीच्या यादीत सोलापूरचा उल्लेख नाही. त्यासंदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. लवकरच सोलापूर महापालिकेसही  अनुदान मंजूर होईल. 
- दत्तात्रय लोंढे, मुख्य लेखापाल सोलापूर महापालिका

सोलापूर : जीएसटीपोटी  राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात फक्त 18 महापालिकांसाठी अनुदान मंजूर केले आहे. त्यामध्ये सोलापूर महापालिकेचा समावेश नाही. त्यामुळे फेब्रुवारीचा पगार लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या अनुदानापोटी महापालिकेस दरमहा १८ कोटी ६० लाख रुपये मिळतात.

जीएसटीपोटी द्यावयाच्या अनुदानाचा आदेश दर महिनाअखेरीस किंवा तीन तारखेच्या आत जारी होतो. त्यामध्ये सर्व 27 महापालिकांना द्यावयाच्या अनुदानाचा उल्लेख असतो. मात्र, मार्च महिन्यासाठी शासनाने जारी केलेल्या अनुदानाच्या यादीत फक्त 18 महापालिकांचा समावेश आहे. त्यासाठी 280 कोटी 47 लाख रुपये तरतूद दाखवली आहे. याशिवाय, बृहन्मुंबईसाठी स्वतंत्र आदेश असून त्या महापालिकेस 647 कोटी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

अनुदान मंजूर झालेल्या महापालिका ः जळगाव, नांदेड-वाघेळा, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, उल्हासनगर, अमरावती, चंद्रपूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, सांगली, मिरज, कुपवाड, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, नाशिक, धुळे व अकोला. 

अनुदान मंजुरीच्या यादीत सोलापूरचा उल्लेख नाही. त्यासंदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. लवकरच सोलापूर महापालिकेसही  अनुदान मंजूर होईल. 
- दत्तात्रय लोंढे, मुख्य लेखापाल सोलापूर महापालिका

Web Title: Marathi news Solapur news GST for municipal corporations