इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि.च्या वतीने सर्व रोगनिदान शिबीर     

चंद्रकांत देवकते
बुधवार, 7 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर) : इंडीयन ऑईल कॉपोरेशन लिमीटेड, कोयली -अहमदनगर -सोलापूर पाईपलाईन्स यांच्या सौजन्याने मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे सर्व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन इंडियन ऑईल कॉपोरेशन कंपनीच्या पश्चिमी क्षेत्र बडोदराचे महाप्रबंधक विनोद कछवाहा यांनी केले. अध्यक्षस्थानी मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के होते.

यावेळी बोलताना कछवाहा म्हणाले इंडियन ऑईल कॉपोरेशन कंपनीच्या वतीने सामाजिक जाणीवेच्या बांधिलिकीतुन ग्रामीण भागातील उपेक्षित व अत्यावश्यक अशा ठिकाणी आरोग्य, वीज , पाणी यासह स्वच्छ भारत मिशन, या अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देणे व समाजातील शेवटच्या घटका प्रर्यत विकासाचा आलेख पोहचविणे यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी व्यासपिठावर शिरापूरचे सरपंच बाळासाहेब राजेपांढरे, उपसरपंच सौदागर साठे, पाकणी येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मुख्य डेपो व्यवस्थापक मोहम्मद शकील अख्तर, व्यवस्थापक सुनील कोल्हटकर, वरिष्ठ व्यवस्थापक अनुक्रमे ए.के. सिंग अहमदनगर, प्रभातकुमार मनमाड, राजेशकुमार बघेलका बडोदा, राकेश महातो प्रबंधक अहमदनगर, गुंजनकुमार कनिष्ठ व्यवस्थापक बडोदा, जिल्हा वनअधिकारी संजय माळी आदी उपस्थीत होते.

या शिबीरात आसपासच्या परिसरातील सुमारे ३०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यासाठी यशोधरा रुग्णालय सोलापूर चे डॉ खलीद जामदार, डॉ स्वप्नाली उगले, यांच्या सह सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या शिबीरास  अंबीका विद्यामंदीरचे मुख्याध्यापक बी.जी. कुलकर्णी, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका  सुशीला शेंडगे , संजय सावंत, गोंविद पाटील, श्रीकांत धोत्रे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते.

Web Title: Marathi news solapur news health check up campaign indian oil corporation