पत्नीची हत्या, मुलींना फास देऊन त्याने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी जवळील वेळेपूर उंबरे गावात आज (मंगळवार) पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. सुभाष अनुसे या व्यक्तीचे नाव असून, त्याने आगोदर पत्नी स्वाती अनुसे हिची हत्या केली.

पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील वेळेपूर उंबरे गावात पतीने पत्नीची हत्या करून आणि दोन मुलींना फास लावून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी जवळील वेळेपूर उंबरे गावात आज (मंगळवार) पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. सुभाष अनुसे या व्यक्तीचे नाव असून, त्याने आगोदर पत्नी स्वाती अनुसे हिची हत्या केली. त्यानंतर ऋतुजा आणि सविता या दोन मुलींना फास लावून त्यांची हत्या केली. कुटुंब संपविल्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली.

आज सकाळी हे कृत्य उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही. माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marathi news Solapur news husband killed wife and daughters